राजापूर तालुक्यातील नाणार येथे खेकडे पकडण्यासाठी वहाळावर गेलेले वडील व मुलगा विजेची तार पाण्यात पडल्याने शॉक लागून जागीच ठार

राजापूर तालुक्यातील नाणार येथे खेकडे पकडण्यासाठी वहाळावर गेलेले वडील व मुलगा विजेची तार पाण्यात तुटून पडल्याने शॉक लागून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील नाणार येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. दिवाकर पुजारी (४२) आणि त्यांचा १0 वर्षांचा मुलगा अथर्व यांचा यात दुर्दैवी अंत झाला.
नाणारमधील चिवारवाडी येथील रहिवासी असलेले पुजारी नाणार ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम करतात. शुक्रवारी सायंकाळी ते आपल्या मुलगा अथर्व आणि गावातील अन्य दोन मुलांसह खेकडे पकडण्यासाठी गिरमादेवी वहाळ येथे गेले होते. खेकडे पकडण्यासाठी दिवाकर आणि अथर्व पाण्याच्या प्रवाहात भांडी लावत होते. त्याचवेळी वहाळावरून जाणाऱ्या ११ केव्ही क्षमतेच्या विजेच्या तारेचा कंडक्टर तुटला आणि वीज प्रवाहीत असलेली तार पाण्यात पडली.त्यामुळे दिवाकर आणि त्यांचा मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button