रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील लोककलावंतांना नामदार उदय सामंत वैयक्तिक पातळीवर मदत करणार, पोलीस मित्रांचाही सन्मान होणार

कोरोनाच्या महामारीमध्ये भजनी, नमन आणि जाखडी मंडळे आर्थिक संकटात सापडली आहेत. लोककलेवर उपजिविका असणाऱ्या मडळींना आर्थिक मदतीची गरज आहे.जिल्ह्यातील लोककला जिवंत राहावी आणि ती समृद्ध व्हावी, यासाठीच रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील ११७ नमन मंडळे, ९५ भजनी तर ५५ जाखडी मंडळांना प्रत्येकी १० ते ५ हजारापर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यात जाहीर कार्यक्रम घेऊन ही वैयक्तिक पातळीवरील मदतीचे वाटप केले जाईल. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरीत ११७नमन मंडळे आहेत. त्यांनाही प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येतील. तर ९५ भजन मंडळे आहेत. त्यामध्ये ९२ पुरुष तर १३महिला भजन मंडळे आहेत. त्यांनाही प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात गुरुवारी आणि रविवारी रत्नागिरीत कार्यक्रम घेऊन ही मदत वाटप केली जाणार आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन केले जाईल. १०० व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहातील. रत्नागिरी-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघातील मंडळांना ही मदत दिली जाणार आहे. प्रत्येक आमदाराने हा कार्यक्रम आखून या मंडळाना त्या-त्या स्तरावर मदत करावी, असे आवाहनही सामंत यांनी केलेतसेच कोरोनाच्या काळात पोलिसांबरोबर काम करणार्‍या ६० पोलिस मित्राचाही सत्कार करण्यात येणार त्यांनाही प्रत्येकी ५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button