पोलीस असल्याची बतावणी करत खेड येथे एकाची सोन्याची चेन लांबविली

खेड येथील राहणारे संजय हटकर हे घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमाने पोलीस असल्याची बतावणी करत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवण्याचा प्रकार घडला
आहे
खेड येथील शिवनेरी नगर येथे राहणारे संजय हटकर हे खेड ते भरणे असे चालत आपले घरी जात असताना महाड नाका येथे एलआयसी ऑफिस समोर मोटरसायकलवरून दोन अज्ञात इसम आले त्यांनी हटकर यांना थांबवून आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांना बनावट कार्ड दाखविले व तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन रुमालात काढून ठेवा असे सांगितले तसेच पस्तीस हजार रुपये किमतीची ही सोन्याची चेन रुमालात ठेवतो असे सांगून काढून घेतली व ती चेन घेऊन ते दोघे मोटरसायकलवरून फरार झाले याबाबत खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button