नाना मयेकरांचे जाण्याने रत्नगिरीच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे …उदय सामंत
आज अचानक माझ्या पी ए चा निरोप आला की नाना मयेकरांचे निधन झाले.. या बातमी वर विश्वासच बसेना..चार दिवसापूर्वी मी आणि नानांचा मुलगा रोहित ह्याची चर्चा झाली ..मी नानांची चौकशी केली सगळं ठीक असल्याचं कळलं आणि आज नानांच जाण मन सुन्न करणार आहे..माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात नानांच्या साक्षीनं झाली.. मी युवा अध्यक्ष झाल्यावर त्यांनी केलेला सत्कार आज डोळ्यासमोर उभा राहिला.. अधिकार वाणीने नानांच चिडण आत्ता कधीच बघता येणार नाही आणि अनुभवता येणार नाही.. राजकारणातील खेळकरवृत्ती त्यांच्याकडून शिकण्याजोगी होती.. पण आत्ता राहिल्या त्या आठवणी.. ह्या आठवणीतच त्यांची विकासाची स्वप्ने पूर्ण करणे आमची जबाबदारी आहे.. नानांच्या स्मृतीस जड अंत करणापासून आदरांजली!
www.konkantoday.com