खेम धरणाच्या डागडुजीसाठी निधी उपलब्ध व्हावा आमदार योगेश कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

खेड : दापोली तालुक्यातील खेम धरणाची दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याने धरणाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या निधीला मंजुरी मिळावी अशी मागणी दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी राज्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दापोली मतदार संघातील
अत्यावश्यक परंतू प्रलंबीत असलेल्या विकास कामांबाबत चर्चा केली.
दापोली तालुक्यातील खेम हे धरण दापोलीकरांची तहान भागविणारे महत्वाचे धरण आहे. मात्र गेल्या काही वर्षात धरणाची डागडुजी न केल्याने हे धरण चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाप्रमाणेच धोकादायक झाले आहे. पावसाळ्यामध्ये या धरणाला धोका असल्याने तात्काळ या धरणाची डागडुजी होणे गरजेचे आहे.
धरणाच्या डागडुजीच्या कामासाठी निधी मंजूर व्हावा असा परिपुर्ण प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप धरण दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक असलेल्या निधीला मंजूरी मिळाली नाही. येत्या काळात धरणाची डागडुजी होणे अत्यावश्यक असल्याने या कामासाठी आवश्यक त्या निधीला मंजूरी मिळावी अशी मागणी आमदार योगेश कदम यांनी या भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button