कुटुंबाची साथ आणि कोरोनावर मात ‘ या विषयांवरपैसा फंड मध्ये विविध स्पर्धा संपन्न

संगमेश्वर दि . २ ( प्रतिनिधी ):- लाल बहाद्दूर शास्त्री आणि महात्मा गांधी जयंती निमित्त आज शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात ‘ कुटुंबाची साथ आणि कोरोनावर मात ‘ या विषयांवर पोस्टर , निबंध आणि रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या . प्रशालेचे मुख्याध्यापक कालिदास मांगलेकर , पर्यवेक्षक सचिनदेव खामकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले . मोठ्या कालावधीनंतर स्पर्धेच्या निमित्ताने आज शाळेत यायला मिळाल्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळला होता .
एका बेंचवर एक याप्रमाणे विद्यार्थ्यांना बसवून प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धा संपल्यानंतर सॅनिटायझर देण्यात आला . उपस्थित विद्यार्थ्यांना विषय समजावून दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्सफूर्तपणे आपला आविष्कार सादर केला . पोस्टर स्पर्धेसाठी रांगोळी स्पर्धेसाठी तर निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी भाग घेतला . पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपला उत्कृष्ट कलाविष्कार सादर केल्याने विद्यार्थ्यांना विषयाचे उत्तम आकलन झाल्याचे दिसून आले . गेले साडेतीन महिने शाळा बंद असल्याने स्पर्धेच्या निमित्ताने सर्व नियम पाळून शाळेत यायला मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button