जिल्हा परिषदेच्या शाळांना खाजगी व्यक्तीचे नाव दिल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई, शिक्षणाधिकारी यांचे आदेश
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीसह अन्य मालमत्तांना खाजगी व्यक्तीचे नाव दिल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे. जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. निशादेवी वाघमोडे यांच्या स्वाक्षरीने सदर आदेशाची प्रत पंचायत समित्यांच्या सर्व गटशिक्षणाधिकार्यांना पाठविण्यात आली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भविष्यात कोणत्याही व्यक्तीचे नाव देण्यास मनाई करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या उपसचिवांनी दिलेल्या आदेशानुसार जि.प.ने त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची भूमिका स्विकारली आहे.
जिल्हा परिषद शाळा प्रवेशद्वार, दरवाजा, भिंती, रंगमंच, विहीर, अन्य कोणत्याही भागांना खाजगी व्यक्तीचे नाव देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
www.konkantoday.com