रत्नागिरी शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या साळवी स्टॉप येथील कचरा डेपोला गुरुवारी दुपारी अचानक आग


रत्नागिरी शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या साळवी स्टॉप येथील कचरा डेपोला गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आगीची माहिती मिळताच नगरपालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. साळवी स्टॉप येथील कचरा संकलन केंद्रात (डेपो) साठवलेल्या कचऱ्याला अचानक गुरुवारी दुपारी आग लागली. कचऱ्यामध्ये प्लास्टिक आणि सुक्या वस्तूंचे प्रमाण जास्त असल्याने आगीचा भडका उडाला. आगीची तीव्रता जास्त असल्याने दूरवरून आगीच्या ज्वाला दिसल्या होत्या.
घटनेचे गांभीर्य ओळखून नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाचा जवानांनी ही या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक सौरभ मलुष्टे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही; मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button