शेतकरी व कामगारांच्या विरोधी कायदेविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे येत्या २ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत निदर्शने
केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांच्या विरोधी कायदे संसदेत मंजूर करून घेतले आहेत. या काळ्या कायद्यांमुळे शेतकरी व कामगारांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी येत्या २ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीत निदर्शने करणार आहे.
ठाण्याचे नगरसेवक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत
www.konkantoday.com