गणपतीपुळे-मुंबई मार्गांवर ’सी-प्लेन’.

राज्य सरकारने सी-प्लेन पर्यटन प्रकल्पाला पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत या सेवेसाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. २०१४ मध्ये सुरू झालेली सेवा लोकांमध्ये फारशी लोकप्रिय ठरली नाही. मात्र, या वेळी अधिक वास्तवदर्शी आणि व्यवहार्य दृष्टिकोन ठेवून सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे येथून थेट मुंबई येथे सी प्लेन सेवा सुरू करण्यात येणार असून याचबरोबर राज्यातील अन्य सात ठिकाणी त्ती प्लेन सेवा प्रस्तावित करण्यात आली आहे.महामंडळाने आठ संभाव्य मार्ग निश्चित केले आहेत, जिथे सी-प्लेन सेवा चालवता येईल. इच्छुक सेवा प्रदात्यांकडून भारतात व परदेशात निविदा मागवण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठीचा मूळ भांडवली खर्च निविदाधारकांकडून केला जाणार असून, सरकार ५ वर्षांच्या कालावधीत गुंतवणुकीची भरपाई करणार आहे. या प्रकल्पासाठी १२ वर्षांपेक्षा जुनी नसलेली ९ ते १९ आसन क्षमतेची सिंगल किंवा ट्रिन इंजिन सी-प्लेन विमाने वापरण्यात येणार आहेत.एमटीडीसीच्या अंतर्गत आर्थिक अभ्यासानुसार, प्रकल्पासाठीचा अंदाजे खर्च ४६६ कोटी रुपये ते ४९० कोटी रुपये होईल. यात ५ विमानांची खरेदी, ६ ठिकाणी जलधारणा उभारणी, परवाने आणि संचालन व्यवस्थेचा समावेश आहे. या सी-प्लेन पर्यटन सेवेचे दर सुमारे ४,००० रुपये असण्याची शक्यता असून, दरवर्षी ५०,००० ते ७०,००० प्रवाशांची वाहतूक होईल आणि प्रकल्प ५ ते ७ वर्षांत नफा मिळवू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button