
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत विजयदुर्ग, देवगड आणि मालवण बंदरात उधाण येणार
मॉन्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात समुद्राला उधाण येणार आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत विजयदुर्ग, देवगड आणि मालवण बंदरात उधाण येणार आहे.यामध्ये विजयदुर्ग आणि देवगड बंदरात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत, तर मालवण बंदरात जून आणि जुलै महिन्यांत भरती येणार आहे. पावसाळी हंगामास सुरुवात होणार असून, राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील मोडत असलेल्या नद्या, खाड्यांमध्ये अतिवृष्टी होऊन तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.www.konkantoday.com