
नागरिकांनी मास्क वापरावा म्हणून पोलिसांकडून सध्या गांधीगिरी नंतर मात्र कायदेशिर कारवाई
राज्यात कोविड – १९ आजाराचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगानेकोरोना आजारास प्रतिबंध व्हावा म्हणुन सोशल डिस्टन्सींग, सॅनिटाझर, मास्क इत्यादी बाबींचा अवलंबकरावा याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी,
बाजारपेठेत, नागरिक सोशल डिस्टन्सींग अथवा मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे.
म्हणुन रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तसेच खेडे गावातून जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेमार्फत मास्क वापरणे, ठराविक अंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे याबाबत जनजागृती करण्यातआलेली आहे. तसेच जे नागरिक मास्क न वापरता आढळून आले त्यांना मास्कचे वाटप करुन संबोधनकरण्यात येत आहे. तसेच चौकाचौकात फिरत्या वाहनाचा वापर करुन पी.ओ सिस्टीमद्वारे नागरिकांनामास्क वापरणेबाबत संबोधित करण्यात येत आहे. तसेच जर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचावापर न केल्यास यापुढे संवधीत शासकीय विभागाकडून कायदेशिर कारवाई केली जाईल. तरी सर्वनागरीकानां विनंती करण्यात येते की, त्यांनी कोविड – १९ अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणेसार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींग व मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक,
रत्नागिरी यांनी केलेले आहे.
www.konkantoday.com