जिल्हा शल्यचिकित्सक बोल्डे सुट्टीवर,त्यांच्या रजेची कारणे व त्या काळातील जिल्हा आरोग्य विभागाच्या व्यवहारांची चौकशी करा–गाव विकास समिती
गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांची मुख्यमंत्री कार्यालय व आरोग्यमंत्री यांच्याकडे मागणी
रत्नागिरी:-कोरोना सारख्या भयानक संकटात रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे प्रमुख डॉ.बोल्डे यांना रजेवर का पाठविण्यात आले याची चौकशी होणे गरजेचे असून त्याच बरोबर त्यांना दिलेल्या सुट्टीच्या काळात रत्नागिरी आरोग्य विभागाच्या व्यवहारांची देखील चौकशी करण्यात यावी अशी जाहीर मागणी रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री कार्यालय व आरोग्यमंत्री यांच्याकडे ट्विटर द्वारे केली आहे.
डॉ.बोल्डे यांना सुट्टीवर पाठविण्यात आले की त्यांनी स्वतः सुट्टी घेतली होती याचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करायला हवा,कोरोना संकट असताना एखाद्या आरोग्य विभागाच्या प्रमुख व्यक्तीला सुट्टीवर पाठविले जाते किंवा सुट्टी दिली जाते त्याचे कारण समोर येणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाचे संकट वाढत असताना दुसरीकडे या कोरोना विरोधात लढण्याची जबाबदारी ज्या आरोग्य व्यवस्थेची आहे त्या आरोग्य व्यवस्थेचे जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बोल्डे हे मधल्या काळात सुट्टीवर होते.त्यांना रजेवर का पाठविण्यात आले?याची माहिती जिल्हावासीयांना देखील मिळणे गरजे आहे असे सुहास खंडागळे यांनी म्हटले असून सदर प्रकरणाचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करायला हवा,त्याच बरोबर या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करायला हवी अशी जाहीर मागणी सुहास खंडागळे यांनी cmo व आरोग्यमंत्री यांना ट्विट करून केली आहे.
www.konkantoday.com