कोकणातील आमदारांच्या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी वेधले

शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. ना. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांनी घेतली कोकणातील आमदारांची बैठक रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष काढल्यास काय वेधले
कोकणातील विविध प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. ना. उद्धवजी ठाकरे यांनी वर्षानिवासस्थानी कोकणातील आमदारांची बैठक घेतली. त्याप्रसंगी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवीह्यांनी रत्नागिरी जिल्ह्य तील विविध समस्या बाबत निवेदन दिले. दिलेल्या निवेदना बाबत शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. ना. उद्धवजी ठाकरे ह्यांनी समस्या सोडवण्याबाबतील आश्वासित केले आहे
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचेआमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खालील प्रमुख मागण्याचे निवेदन *शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. ना. उद्धवजी ठाकरे ह्यांना दिले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मागणीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर ओणी येथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल व्हावे मागणी केली होती त्याला लवकर मंजुरी देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली याशिवाय

१) रत्नागिरी जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल तसेच उप जिल्हा रुग्णालय, तालुका कोविड सेंटर येथे M.B.B.S डॉक्टर फिजिशियन, नर्सेस, टेक्निशियन, क्लार्क यांची भरती प्रक्रिया करावी

२) प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करावी तसेच औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत.

३)महामार्गावर एखादा मोठा अपघात झाल्यास मुंबई किंवा पुणे येथे रुग्णांना घेऊन जाण्यास १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही तरी त्यांच्या निकषात बदल करून रुग्णांना १०८ रुग्णवाहिका मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्यास उपलब्ध करून व्हाव्या

४)कोविड-१९ रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढविण्यासाठी विनंती केली.

५)लांजा तालुक्यात M.I.D.C व्हावी अशी मागणी केली
६)लोकडाऊन काळामध्ये आलेल्या लाईट बिला मध्ये लावण्यात वहन कर पर युनिट १.४५ व १६% वीज आकारणी शुल्क कमी करावीत

७)घर बांधणी व घर दुरुस्ती संबंधी सुधारित शासन निर्णय येथे आवश्यक असून याबाबत उचित कार्यवाही करावी

८)रत्नागिरी जिल्हा पर्यटक जिल्हा म्हणून घोषित व्हावा तसेच विकासकामांना प्राधान्य द्यावे.

९)PWD अ.ब.क बजेट वरील स्थगिती उठवावी अशा प्रमुख मागण्या राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी त्याप्रसंगी केल्या.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button