आंबोली घाटात सापडलेल्या महिलेच्या घातपात प्रकरणाचा अखेर येथील पोलिसांनी छडा लावला

सावंतवाडी – आंबोली घाटात सापडलेल्या महिलेच्या घातपात प्रकरणाचा अखेर येथील पोलिसांनी छडा लावला असून, या प्रकरणातील चार संशयितांना आज गजाआड केले. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक अमित गोते यांनी मोबाईल कॉल रेकॉर्डवरून मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास अवघ्या २१ दिवसांत लावला. याप्रकरणी शहरातील दोघांना तर कोलगावमधील दोघांना ताब्यात घेतले आहे. लक्ष्मण ऊर्फ योगेश रवींद्र आडणेकर (वय २३, रा. कोलगाव ता. सावंतवाडी ), योगेश सुभाष कांबळे (२३, रा. गरड सावंतवाडी) अशी त्यांची नावे असून यातील अन्य दोघे अल्पवयीन आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button