
महाराष्ट्रानेही येथील मच्छीमारांच्या हितासाठी आपल्या समुद्राच्या सीमा सील कराव्यात
गुजरात सरकारने आपल्या राज्यातील मच्छीमारांच्या हितासाठी त्यांच्या समुद्रक्षेत्रात परराज्यातील मच्छीमार नौकांना बंदी घातली आहे. महाराष्ट्रानेही येथील मच्छीमारांच्या हितासाठी आपल्या समुद्राच्या सीमा सील कराव्यात, अशी मागणी रत्नागिरी तालुका पर्ससीन मालक असोसिएशन आणि जिल्हा पर्ससीन मालक असोसिएशनने संयुक्तपणे केली आहे. या मागणीसह इतर मागण्या मान्य न झाल्यास समुद्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
परप्रांतीय नौका कोकणातील समुद्रामध्ये घुसखोरी करतात. नुकताच वादळाचा इशारा होता तेव्हा ५०० पेक्षा अधिक परप्रांतीय नौका रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरांवर आश्रयासाठी आल्या होत्या.
काहीजण पारंपरिक आणि पर्ससीन नेट मच्छिमारांचे भांडण लावून आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप तालुका असोसिएशनचे विकास उर्फ धाडस सावंत आणि नासीरशेठ वाघू यांनी पत्रकार परिषदेत केला.
www.konkantoday.com