चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर अखेर अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय
चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व बेकायदेशीपणे कामे केल्याचा ठपका ठेवत काल सोमवारी महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महाविकास आघाडीचे १८ सदस्य उपस्थित होते. नगराध्यक्षांवरअविश्वास ठराव आणण्याबाबत मतदान घेण्यात आले व अठरा सदस्यांनी हात वर करून मतदान केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. अविश्वास ठराव दोन दिवसात जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे व नगराध्यक्ष यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात येणार आहे
www.konkantoday.com