आमदार निवास मध्यरात्री बॉम्बने उडवून देण्याची धमकी
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात मध्यरात्री 12 च्या सुमारास आलेल्या एका निनावी फोनने खळबळ उडाली होती. मंत्रालयाशेजारीच असलेलं आकाशवाणी आमदार निवास मध्यरात्री बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा तो कॉल होता. या कॉलनंतर तात्काळ आमदार निवास रिकामं करण्यात आलं. त्यानंतर बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झालं.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीनं फोन करून आमदार निवास बॉम्बने उडवून देणार असं सांगितलं. त्यानंतर आमदार निवासातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्रभर बॉम्ब पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेतला. मात्र कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळली नाहीत.
www.konkantoday.com