संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापार्यांच्या विरोधामुळे राष्ट्रीय महामार्गासाठीचे वाढीव भूसंपादन स्थगित
संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापार्यांच्या विरोधामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी सुरू असलेली वाढीव भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
भूसंपादनासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना २०० व्यापार्यांनी निवेदन दिल्यानंतर सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्ग चौपदरीकरणासाठी संगमेश्वर, माभळे परिसरात वाढीव भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. वाढीव भूसंपादनामुळे संगमेश्वरची संपूर्ण बाजारपेठ उध्वस्त होणार असल्याने सर्व व्यापार्यांनी या प्रक्रियेला तीव्र विरोध केला आहे.
konkantoday.com