लॉकडाउन काळातील विजबिले माफ व्हावित या मागणी साठी मनसे जिल्हा अध्यक्षांचे आमरण उपोषण
आरवली-रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम विज ग्राहकाना लॉकडाउन काळातील पहिल्या तीन महिन्याची विजबिल माफी मिळावी किवा मागील ४० वर्षापासूनचे विजेचे खांब व विज वाहिन्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत आहेत त्यांचे भाड़े द्या या प्रमुख मागणी करिता मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यानी आमरण उपोषण कड़वई येथील आपल्या निवासस्थानी आज सोमवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापसुन सुरु केले आहे . या उपोषणाला पंचक्रोशीतून वाढता पाठिंबा मिळत आहे .
रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम विजग्राहकाना लोकडाऊन काळातील वीजबिल माफी झाली पाहिजे , वाढीव वीज दर रद्द झाला पाहिजे तसेच व्यवसायिकांना सरासरी वीजबिल न देता त्यांच्या वापरप्रमाणे वीज बिल देण्यात यावीत यासाठी महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा केला जात आहे . यासाठी मनसेच्या वतीने दिवेबन्द आंदोलन ही करण्यात आले होते .या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून वाढता पाठिंबा मिळाला आहे .ग्राहकांनी वीजबिल न भरता या आंदोलनात सहभागी नोंदवला .
मात्र प्रशासन किंवा विजवितरण कम्पनी यांच्याकडून याबाबत योग्य कार्यवाही झाली नाही .लोकडाऊन काळात शेतकऱ्यांसह मजूर छोटे व्यवसायिक मध्यम वर्गीय नागरिक हे रोजीरोटीपासून वंचीत आहेत .नागरिकांचे दैनंदिन जीवन हलाकीचे झालेले असताना केंद्र किंवा राज्यसरकार कडून कोणत्याही प्रकारची मदत दिली गेली नाही .असे असताना महावितरण कंपनीकडून वारेमाप वीजबिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आल्याचे दिसून येत आहे .यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहें.
www.konkantoday.com