
रत्नागिरी शहरातील मोकाट गुरे आणि उनाड कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टी तर्फे अनोखे आंदोलन
रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टी तर्फे आज अनोखे आंदोलन करण्यात आले . १५ दिवसांपुर्वी रत्नागिरी शहरातील मोकाट गुरे आणि उनाड कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा गुरे पकडुन कार्यालयात सोडू असा ईशारा देण्यातआला
मुख्याधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देवुन सुद्धा मोकाट गुरांचा आणि कुत्र्यांचा त्रास रत्नागिरी शहरातील नागरीकांना सहन करावा लागत आहे . गुरे पकडण्याची मोहीम राबविण्याबाबत नगरपरिषद प्रशासन आणि प्रमुख पदाधिकारी उदासीन असल्यामुळे भाजपा रत्नागिरी शहराच्या वतीने आज शहरभर रस्त्यात ठाण मांडुन बसलेल्या गुरांच्या गळ्यात अकार्यक्षम लोकप्रनिनिधी आणि प्रशासन यांचा जाहीर निषेध असल्याचे बोर्ड अडकविण्यात आले होते
यावेळी आंदोलनात राजीव कीर , भैया मलुष्टे , प्रशांत डिंगणकर , अशोक वाडेकर , ययाती शिवलकर , बंड्या भाटकर , मनोज कीर ज्योतीप्रभा पाटील आदींनी सहभाग घेतला
www.konkantoday.com