
मुकुल माधव ज्युनियर कॉलेज फॉर सायन्स अँड कॉमर्सचे उद्घाटन
फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या मुकुल माधव कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे २८ सप्टेंबर २०२० रोजी सोशल डिस्टंगिंग नियमांचे आणि स्वच्छतेच्या खबरदारीचे काटेकोरपणे पालन करून उद्घाटन करण्यात आले. माध्यमिक शालांत परीक्षेत मिळालेल्या 100% यशानंतर शिक्षणाचा हा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामीण भागातील मुलांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी देण्यात येणार्या उच्च प्रतीच्या शिक्षणाचा दर्जा कायम टिकवत मुकुल माधव फाउंडेशन तर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून जुनिअर कॉलेजची मुहूर्तमेढ करण्यात आली आहे.
या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमास श्रीमती. शिल्पाताई पटवर्धन, जेष्ठ. शिक्षणतज्ज्ञ व कार्याध्यक्ष, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी , फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक श्री संजय मठ, ऍड. रुची महाजनी ,शिक्षिक वर्ग, विद्यार्थी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
विद्यार्थ्यांसाठी अभिमुखता कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या ऑनलाइन वर्गांचे वेळापत्रक ठरविण्यात आले. २९ सप्टेंबर २०२० पासून विज्ञान आणि वाणिज्य या शाखांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू होतील. यावेळी विद्यार्थी जेथे त्यांच्या भविष्य जीवनाची ते नवीन सुरवात करणार आहेत त्या पायाभूत सुविधांबद्दल आनंद व्यक्त केला आणिं व्यवस्थापनाचे आभार मानले.
www.konkantoday.com
