चिपळूण शहरामध्ये नवीन कोविड सेंटरची परवानगी देताना नियमांचे पालन व्हावे
चिपळूण शहरामध्ये नवीन कोविड सेंटरची परवानगी देताना सदर कोविड सेंटरच्या पार्किंगची सोय, सांडपाणी वाहतुकीची व्यवस्था, रहिवासी क्षेत्र किती जवळ आहे व रस्ता वीस फुटाचा आहे अथवा नाही याची माहिती, त्याचे परिपूर्ण अवलोकन करून मगच परवानगी देण्यात यावी. अन्यथा तेथील स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागतो व त्यामुळे वादाचे प्रसंग उदभवू शकतात असे मत नगरसेवक शशिकांत मोदी यांनी मांडले आहे.
konkantoday.com