कोल्हापूर जिल्ह्यातील सीपीआरच्या ट्रामा सेंटरमध्ये आग ,चार रूग्णांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीपीआरच्या ट्रामा सेंटरमध्ये आग लागली आहे. या नंतर सर्वांना अन्यत्र हलवण्यात आले आहे. ही आग आज (दि.२८) पहाटेच्या सुमारास लागली.
ही घटना समजल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई तातडीने सीपीआर परिसरात पोहोचले आणि पाहणी केली. या विभागात कोरोना गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते.
या घटनेत चार रूग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सीपीआरच्या अधिष्ठातांसह सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटने लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने दाखल होऊन आग आटोक्यात आणली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button