
कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर बांबू व काष्ठ कार्यशाळा
जागतिक बांबू दिनाचे औचित्य साधत येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांतर्गत वनशास्त्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर बांबू व काष्ठ कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते पार पडले
जागतिक बांबू दिनाच्या निमित्ताने वनशास्त्र महाविद्यालयात पारंपारिक कार्यशाळेचे नवीन उपकरणे व यंत्रे बसवून आधुनिक अशी बांबू व काष्ठ कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेत बांबूपासून अगरबत्ती तयार करण्याची यंत्रे तसेच बांबू, लाकूड, प्लायवूड संगणकीय कोरीवकाम करणारे यंत्र स्थापन करण्यात आले आहे. या कार्यशाळेतून बांबूचे आकाशकंदील, मोबाईल स्टँड, लॅम्पशेड, पेनस्टँड, फ्लॉवरपॉट तसेच इतर अनेक शोभेच्या वस्तू हस्तकलाकृती तयार करण्यात येत होत्या. त्या आता अधिक सुबक आणि नक्षीदार होण्यास मदत होणार आहे. तसेच खुर्च्या टेबल, स्टूल यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येणार आहे.
konkantoday.com