केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक कोकणातील शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी फायदेशीर आहे. केवळ राजकारणासाठी या विधेयकाबद्दल जाणून न घेता विरोध करणे चुकीचे आहे. सर्वच पक्षातील लोकांना या विधेयकाचे फायदे ठाऊक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एका पक्षाच्या युवक संघटनेने केवळ या विधेयकाविरोधात आंदोलन केले. या युवकांमध्ये किती शेतकरी आहेत, हा संशोधनाचा विषय आहे, असे भाजपचे उत्तर जिल्हा रत्नागिरी अध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी आज चिपळूण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
www.konkantoday.com
Back to top button