करोना महामारी मुळे सर्वसामान्यांची वीजबिलामुळे दमछाक होत असताना राज्यातील१५ मंत्र्यांना मागील चार ते पाच महिन्यापासून वीजबिलंच पाठवली नाहीत

करोना महामारी मुळे सर्वसामान्यांची वीजबिलामुळे दमछाक होत आहे असे असताना राज्यातील बड्या १५ मंत्र्यांना मागील चार ते पाच महिन्यापासून वीजबिलं आली नसल्याची माहिती समोर आली आहे. धनजंय मुंडे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि इतर मंत्र्यांना मागील काही महिन्यापासून वीज बिल आलं नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलेय.
लॉकडाउनच्या काळात आलेली वीजबिलं भरताना सर्वसामान्यांचा खिसा रिकामा झाला होता. सर्वसामन्यांसह सेलिब्रिटींनाही वीजबिलाचा शॉक बसला होता.प्रकरणात RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये या महिन्यात राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या वीजबिलाबाबत माहिती विचारली. लोक निर्माण विभागातील दक्षिण उप-विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये राज्यातील १५ मंत्र्यांना वीजबिलं पाठवण्यात आलेली नाहीत. RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मेपासून पाच मंत्र्यांना विजेची बिलं पाठविण्यात आलेली नाहीत. यामध्ये दादाजी भुसे, केसी पाडवी, अमित देशमुख, हसन मुश्रीफ आणि संजय राठौड यांची नावे आहेत. मागील महिन्यांपासून जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड़, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब, बाळासाहेब पाटील यांना विजेची बिलं पाठविण्यात आलेले नाहीत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button