भाजपा आणि मनसे पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

खेड : शिवसेना नेते रामदास कदम आणि दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या जि.प. पं.स. उमेदवारांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे दापोली मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या जामगे निवासस्थानी वेरळ, सुकीवली, भरणे, येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला.
शिवसेना नेते रामदास कदम आणि खेड तालुका हे १९९० पासूनचे एक वेगळे नाते आहे. रामदास कदम यांनी आपल्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे या तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व कायम राखले आहे. २००९ च्या निवडणुकांदरम्यान खेड मतदार संघाचे विभाजन होवून अर्धा मतदार संघ दापोली तर अर्धा मतदार संघ गुहागर या मतदार संघात समाविष्ट झाला. मात्र तालुक्यावरील शिवसेनेचे वर्चस्व कमी झाले नाही. दरम्यानच्या काळात काही राजकिय वादळे आली पण त्यामुळे तालुक्यावरील शिवसेनेच्या वर्चस्वाला फारसा धक्का लागला नाही.
दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांना शिवसेना नेतृत्वाने दापोली मतदार संघाची उमेदवारी दिली. २०१६ पासून युवा सेनेच्या माध्यमातून दापोली मतदार संघ पिंजून काढलेल्या योगेश कदम यांनी ही निवडणुक अपेक्षेप्रमाणे जिंकली आणि २०१४ च्या निवडणुकीत दापोली मतदार संघावरून उतरलेला शिवसेनेच्या भगवा झेंडा पुन्हा या मतदार संघावर डोलाने फडकू लागला.
१९९० साली खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार झाल्यावर रामदास कदम यांनी ज्या प्रमाणे या तालुक्यात शिवसेनेचा झंझावात निर्माण केला होता. विकासकामांच्या माध्यमातून मतदारांची मने जिंकली होती त्याच पावलांवर पाऊल ठेवत आमदार योगेश कदम यांनी देखील या संपुर्ण मतदार संघात विकास कामांचा धडका लावला आहे. मतदारांच्या समस्या जाणून घेत त्या निवारण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना काळ आणि ३ जून रोजीच्या निसर्ग वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आमदार योगेश कदम यांनी मतदार संघात केलेले काम संपुर्ण महाराष्ट्रामध्ये कौतुकास्पद आहे.
आमदार योगेश कदम यांची विकासात्मक दुरदृष्टी, काम करण्याची पद्धत आणि अगदी शेवटच्या कार्यकर्त्यालाही दिली जाणारी आपुलकीची वागणुक यामुळे अन्य पक्षातील अनेक कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या प्रवाहात सामील होवू लागले आहेत. जामगे येथे शनिवारी झालेल्या
पक्ष प्रवेशामध्ये नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीची भाजपाचे उमेदवार यांचाही समावेश आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button