परशुराम घाटातील दरीत कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील दरीत कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
भावेश शशिकांत भोंगे (२७, खेर्डी एमआयडीसी मफतलाल कॉलनी) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबतची फिर्याद त्याचा भाऊ राजेश शशिकांत भोंगे यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली आहे. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास पुष्कर कंपनी पीरलोटे ते खेर्डी असा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या दुचाकीने प्रवास करीत होता. दरम्याने तो परशुराम घाटातील ताज हॉटेलच्या पुढील यु आकाराच्या वळणावर आला असता त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. दुचाकी कंट्रोल न झाल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला १५ फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला.
konkantoday.com