जमीयते उल्मा ए हिंदच्यावतीने घेण्यात आलेल्या शिबिरात ४० दात्यांनी केले रक्तदान
कोरोना कालावधीत रक्ताची गरज सातत्याने भासत असते. कधीकधी अचानक रक्ताची आवश्यकता भासते आणि रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडते. रुग्णांच्या नातेवाईकांची ही गैरसोय दूर व्हावी यासाठी जमीयते उल्मा ए हिंद या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे.
रत्नागिरी येथील जमीयत उल्मा ए हिंद या संस्थेने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. अचानक लागणारा रक्तसाठा रक्तपेढीत उपलब्ध असावा यासाठी या संस्थेने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला रक्तदात्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरात ४०रक्तदात्यांनी रक्तदान करुन या सामाजिक सेवेत सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे मुफ्ती तौफिक सारंग, मुकादम, मन्सूर काझी, इम्रान सय्यद, मौलाना बगदादी आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com