
उमेद (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान)हे बाह्य संस्थेकडे वर्ग करू नये म्हणून सावित्री महिला ग्रामसंघ वळके यांनी उन्नती प्रभाग संघ हातखंबा यांच्याकडे दिले निवेदन
रत्नागिरी -उमेदने गावातील असंख्य महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे केले आहे. अशी संस्था बाह्य यंत्रणेकडे दिली तर उमेदची यंत्रणा कोलमडून पडू नये व महिलांच्या संसाराची घडी विस्कटू नये म्हणून सावित्री ग्राम संघ वळके यांनी उन्नती प्रभाग संघ हातखंबा अध्यक्ष सौ भूमी सावंत यांच्याकडे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी दिले.त्यावेळी प्रभाग संघ सचिव सौ झापडेकर प्रभाग व्यवस्थापक सौ प्रेरणा घडशी उपस्थित होत्या.
उमेदमुळे घरात अडकून पडलेली स्त्री आज अनेक व्यवसाय करत आहे.पाली प्रभागात अनेक महिलांनी उमेदीच्या आर्थिक साहाय्याने आपले स्वतःचे उद्योगधंदे सुरू केले आहेत.उदा वळके येथील ग्राम संघाने कुक्कुटपालन व्यवसाय,खानु येथील भाजीपाला उत्पादन, खाद्य पदार्थ तयार करणे असे अनेक व्यवसाय महिला सक्षमपणे करत आहेत
2015 पासून सुरू झालेल्या उमेदने आजपर्यंत किमान पाली प्रभागात येणाऱ्या गटांना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ दिले आहे.उमेदमुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक सुशिक्षिता आली.त्या स्वतःच्या आर्थिक व्यवहार स्वतः करू लागल्या आहेत त्यात ही यंत्रणा बदली गेली तर अनेक महिलांचे कुटुंब कोलमडून जातील.उमेदची प्रत्येक व्यवसाय,उत्पादक गट यासाठी स्वतंत्र निरीक्षण करणारी यंत्रणा असल्याने गट,संघ उत्कृष्ट कार्य करीत आहेत.उमदेचे नियम व अटी यांचा अवलंब करत ग्रामीण भागातील महिला सक्षम होत आहेत
महिला सार्वजनिक क्षेत्रात माणूस म्हणून उभी करणारी उमदे संस्था बाह्य संस्थेकडे जाऊ नये असे प्रत्येक महिलेला वाटते यांची दखल मान मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी अशी विनंती उन्नती प्रभाग संघ अध्यक्ष सौ भुमी सावंत यांनी केली आहे.
www.konkantoday.com