समुद्रातील वादळी वातावरण आता निवळले,वादळामुळे थांबलेली मासेमारी सुरू
समुद्रातील वादळी वातावरण आता निवळले असून सागरी मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. वादळामुळे थांबलेली मासेमारी सुरू झाली आहे.गेला दीड महिन्याचा मासेमारी हंगाम नुकसानीत गेला आहे. गेले चार-पाच दिवस वादळी वातावरण होते. काल वातावरण निवळले असून रत्नागिरी, जयगड आणि आंजर्ले खाडीत असणाऱ्या काही मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन दिवसात वातावरण शांत राहिले तर सर्व नौका मासेमासाठी खाडीतून बाहेर पडण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com