
श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळ, रत्नागिरी यांजकडून महिला रुग्णालयासाठी ४“ऑफिस कपाट” भेट.
श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळ, मारुती मंदिर सर्कल, रत्नागिरी यंदा सामाजिक उपक्रमांचे नियोजन करुन हे मंडळ कामकाज करत आहे. ना.श्री.उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविले जाणार आहेत. या सामाजिक उपक्रमांचा प्रारंभ या मंडळातर्फे शासकीय रुग्णालय, महिला रुग्णालय, आंबेडकर भवन, आयटीआय, बीएड कॉलेज या सर्व ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करुन करण्यात आला होता.
दि.२५ रोजी या मंडळातर्फे महिला रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या ४ऑफिस कपाटांची भेट देण्यात आली. महिला रुग्णालयातील रुग्णांचे उपचाराची जबाबदारी सोपविण्यात आलेले डॉ.मतिन परकार यांनी सदर कपाट आवश्यक असल्याची बाब निर्दशनास आणली होती. *नामदार उदय सामंत यांनी याची त्वरीत दखल घेऊन श्री रत्नागिरी राजा सार्वजनिक उत्सव मित्रमंडळातर्फे सदर भेट दिली.
*महिला रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बोल्डे यांचे ताब्यात कपाट भेट देताना मंडळाचे कार्यकर्ते तसेच पंचायत समिती सदस्य श्री.ऋषिकेश भोंगले, मनोज साळवी, अमरेश पावसकर, नेताजी पाटील, किरण कामतेकर, नरेंद्र देसाई, दिनेश माईण, प्रविण साळवी,प्रवीण भाताडे हे उपस्थित होते.
*महिला रुग्णालयातील कर्मचारी वर्गानेदेखिल येथील कार्यालयीन कामकाजाकरीता सद्यपरिस्थीत आवश्यक असणारी भेट दिल्यामुळे समाधान व्यक्त करुन मंडळाचे आभार मानले.
www.konkantoday.com