
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट ? , राजकीय क्षेत्रात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ही भेट झाली असली तरी संजय राऊत यांनी मात्र या भेटीचा इन्कार केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसते.दुपारी दीड ते साडेतीन पर्यंत चर्चा झालीय. या दोघांच्या भेटीच्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे. संजय राऊत यांनी भेट झाली नसल्याचा दावा केला आहे. ग्रँड हयात हॉटेल सांताक्रुझ वाकोला येथे गुप्त बैठक झाली.
www.konkantoday.com