
शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच आहे-विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
फडणवीस-राऊत यांची अचानक भेट झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच भाजपचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काही सूचक वक्तव्य केली आहेत.शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच आहे. गेली अनेक वर्षे दोन्ही पक्ष एकत्र युतीमध्ये होते. यामुळे येत्या काळात काही राजकीय विस्फोट झालेच तर प्राधान्य विचारधारा समान असलेल्या पक्षाला दिले जाईल. तर, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकत हे आपण याआधीच पाहिलं आहे.” अशी प्रतिक्रिया दरेकरांनी या भेटीवर दिल्यामुळे भाजपकडून होणाऱ्या हालचाली या भविष्यातील सत्तेची पायभरणी असू शकते अशी शंका व्यक्त केली जात आहे.
www.konkantoday.com