
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्वीट डिलीट केल्याने जोरदार चर्चा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्वीट डिलीट केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र हे ट्वीट डिलीट का केलं याचं कारण अजित पवार यांनी सांगितलं आहे. “समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी डिलीट केलेल्या ट्वीटबाबत दिली.
अजित पवार यांनी आज सकाळी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र तासाभरातच अजित पवारांनी हे ट्वीट डिलीट केलं
www.konkantoday.com