राज्य सरकार निर्णय घेईपर्यंत राज्यातील मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे बंदच राहणार
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. तर अनेक गोष्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विरोधकांकडून सातत्याने मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे यावरील बंदी उठविण्याची मागणी केली आहे. मात्र, सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केल्याने राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत.
राज्य सरकार निर्णय घेईपर्यंत राज्यातील मंदिर आणि इतर धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत.
www.konkantoday.com