रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेत आघाडीवर- ना.उदय सामंत

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी शासनाने जाहीर केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यानी चांगली कामगिरी बजावली असल्याची माहिती ना.उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झालेल्या कामाचे कौतुक केले होते.रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८०.७९% इतके झाले आहे.तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर ३.५ % च्या आत आला आहे.यामुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय व आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत असल्याचे दिसत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला २ मास्क व १ सॅनिटायझर देण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती सामंत यांनी दिली.हा मास्क चांगल्या दर्जाचा असून ते धुऊन परत वापरू शकतील अशा प्रकारचे राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले.सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात करण्यात येणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम असल्याचे सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button