बंदर विभागालाही कोरोनाचा फटका महसुलात घट
रत्नागिरी गटातील बंदरांवर येणार्या आणि येथून जाणार्या जहाजांवरील मालातून मिळणारा बंदर विभागाचा महसूल कोरोना काळात सुमारे ६०टक्क्यांनी घटला आहे. कोरोना काळातील मागील सहा महिन्यांत अवघा ६० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी वर्षभरात ३ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या बंदरांचा गटनिहाय समावेश झालेला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काही बंदरे वेंगुर्ले गटात गेली आहेत. रत्नागिरी गटामध्ये ९ बंदरे येतात. यामध्ये रत्नागिरीतील फिनोलेक्स, अल्ट्राटेक, वरवडे, जयगड, दाभोळ, बोर्या, पालशेत, हर्णै, केळशी, बाणकोट या बंदरांचा समावेश आहे
www.konkantoday.com