
नियोजनबद्ध वसुलीमुळे जिल्हा बँकेच्या एनपीएत १८ कोटी ७४ लाख रुपयांची वाढ ,कर्जदारांना ही दिलासा
लॉकडाऊनच्या कालावधीत अधिकारी, कर्मचार्यांनी प्रभावीपणे नियोजनबद्ध वसुली केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एनपीएत १८ कोटी ७४ लाख रुपयांची घट झाली आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या नफ्यात भरघोस वाढ झाली आहे.
बँकेने ३१ मार्च अखेरीस एनपीए कर्जवसुलीवर लक्ष केंद्रीत केले होते. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीतही बँकेचे अधिकारी, कर्मचार्यांनी नियोजनबद्ध वसुलीवर भर देवून एनपीएत घट आणली आहे. आरबीआय सुचनेनुसार बँकेने १ मार्च ते ३१ ऑगस्ट या कालावधीतील मुदतीत कर्जाचे हप्त्यांकरिता सहा महिने मुदतवाढ घेवून कर्जदारांना लॉकडाऊनमध्ये उदभवलेल्या आर्थिक अडचणींवर दिलासा दिलेला आहे.
konkantoday.com