
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला पर्यावरण संवर्धन करणाऱ्या २४० विजेवरील (इलेक्ट्रीक) बसगाडय़ा मिळणार
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला पर्यावरण संवर्धन करणाऱ्या २४० विजेवरील (इलेक्ट्रीक) बसगाडय़ा देण्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. फेम-२ योजनेअंतर्गत या बस दाखल केल्या जाणार आहेत.
यातील एसटी महामंडळाला १०० बस, मुंबईतील बेस्ट उपक्रमाला ४० आणि नवी मुंबईसाठी १०० बस मिळणार आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, चंदीगढला एकूण ६७० वीजेवरील बस पुरवण्याचे जाहीर केले आहे. त्यात महाराष्ट्राच्या वाटय़ाला २४० बस आहेत.
www.konkantoday.com