कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी व त्यातून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच मानावा लागेल, सामन्यांमधून केंद्र शासनावर टीका
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा तडकाफडकी निर्णय घेतल्याने देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहेकांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार असल्याने महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांसह भाजपातील नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याच दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ‘मोदी सरकार’वर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
“कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी व त्यातून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच मानावा लागेल, पण त्यावर सरकार बोलायला तयार नाही” असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. तसेच “देशातील कामगार व शेतकरी अशा कोंडीत फसले आहेत की, त्यांना जगणे कठीण झाले आहे. हे सगळे विषय गंभीर आणि चिंताजनक आहेत. देशातला विरोधी पक्ष क्षीण बनला आहे म्हणून सरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. मरणाच्या दारातला शेतकरी आणि कष्टकरीच क्रांतीची मशाल पेटवतो” असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.
www.konkantoday.com