औषधांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत चीनने १० ते २० टक्के वाढ केली
औषधांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत चीनने १० ते २० टक्के वाढ केल्यामुळे भारतीय औषध उद्योगाला फटका बसला आहे. त्यामुळे काही प्रमाणात औषध उद्योगांच्या नफ्यावर तसेच काही औषधांच्या किमतीवर याचा परिणाम होणार आहे. दुसरीकडे या प्रश्नाबाबत आता इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन सरकारशी चर्चा करणार आहे.
प्रतिजैवक औषधे, स्टिरॉइड व अन्य विविध प्रकारच्या औषधांसाठी लागणारा ९० टक्के कच्चा माल हा चीनमधून आयात केला जातो.
www.konkantoday.com