
साईभूमीनगर गृहनिर्माण सोसायटीला नळ कनेक्शन देण्यास पर्यटन संस्थेचा विरोध
शिरगांव ग्रामपंचायत क्षेत्रातील तिवंडेवाडी येथील साईभूमीनगर गृहनिर्माण सोसायटीला नळ कनेक्शन देण्यास मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेने विरोध केला आहे. संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना निवेदन देवून गृहनिर्माण सोसायटीला नळ कनेक्शन देण्यात येवू नये अशी मागणी केली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहराबाहेरील गृहनिर्माण सोसायटीला नळ कनेक्शन देण्याचा प्रस्ताव उपस्थित नगरसेवकांनी मंजूर केला आहे. रत्नागिरी शहराच्या बहुतांशी भागात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. शहरात इमारतींची संख्या वाढत असून फ्लॅटधारकांना मागणीनुसार पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होत नाही. शिरगांव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी स्वतंत्र पाणी योजना शासनाने मंजूर केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील २ ग्रामपंचायतींसाठी १४७ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली असून त्यात शिरगांवचा देखील समावेश आहे.
konkantoday.com