शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती चुकीची
माध्यमिक शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती वरिष्ठ पातळीवरून केली जात आहे. ही सक्ती चुकीची असल्याचे अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा गंभीर स्थितीत माध्यमिक शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करणे हे शासकीय नियमांचे उल्लंघन आहे. शिक्षकांना शाळेत न बोलविण्याबाबत प्रशासनाला वरिष्ठ अधिकार्यांनी सूचित करावे अशी मागणी जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी केली आहे.
konkantoday.com