लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारे कविवर्य द्वारकानाथ शेंडे पुरस्कार जाहीर
चिपळूण: येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारे कविवर्य द्वारकानाथ शेंडे पुरस्कार जाहीर झाले आहेत. काव्य लेखनासाठीचा ‘मृदूंगी’ पुरस्कार सौ. संगीता बर्वे यांच्या ‘अंतरीच्या गर्भी’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला आहे. विक्रम भागवत यांच्या ‘जंजाळ’ कादंबरीला ‘मनबोली’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील तळेरे येथील डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या ‘कोकणचो डॉक्टर’ या संग्रहाला ‘मोक्षदा’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच द्वारकानाथ शेंडे ‘गात जा अभंग’ पुरस्कार कन्साई नेरोलॅक कंपनीचे जनसंपर्क अधिकारी श्री. संतोष देशमुख यांना देण्यात येणार आहे. संदीप गोणबरे, राष्ट्रपाल सावंत, चंद्रकांत राठोड यांच्या निवड समितीने एकमताने या पुरस्कारांची निवड केली आहे. लवकरच एका सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, असे लोटिस्माचे अध्यक्ष अरुण इंगवले, उपाध्यक्ष डॉ. यतीन जाधव व कार्यवाह विनायक ओक यांनी सांगितले.
www.konkantoday.com