रत्नागिरीच्या नुतन पोलिस अधिक्षकांचे समविचारी मंचने केले स्वागत.
रत्नागिरी : रत्नागिरीचे नुतन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ मोहितकुमार गर्ग यांचे महाराष्ट्र समविचारी मंचच्या पदाधिका-यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,राज्य युवा आघाडी प्रमुख निलेश आखाडे उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत समविचारी ही लोकाभिमुख संघटना असून वैचारिक व्यासपीठ असलेली संघटना आहे.राज्यभरात या संघटनेचे काम सुरु असून राज्यात २१ जिल्हाध्यक्ष आणि १० महिला अध्यक्ष कार्यरत असल्याचे पुनसकर यांनी सांगितले.
संघटनेचे कामकाज सनदशीर शांतमय मार्गाने चालते असे सांगून संघटनेचे प्रमुख बाबासाहेब ढोल्ये यांनी पोलिस वसाहतीचा प्रश्न प्राधिकरणापर्यत मांडल्याची आठवण आखाडे यांनी विशद केली.
जिल्हाध्यक्ष भडेकर यांनी सामान्य व्यक्ती प्रमाणभूत मानून आम्ही काम करतो.यासाठी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेने सहकार्य करावे अशी विनंती केली .
चर्चेनंतर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ मोहितकुमार गर्ग यांनी माहिती घेता समविचारी विषयक कल्पना मिळाली असून न्याय्य मार्गाने कार्य करा.आमचे सहकार्य कायम असेल अशी ग्वाही दिली.लवकरच विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण एका बैठकीचे आयोजन करु असे पोलिस अधिक्षक गर्ग यांनी स्पष्ट केले. अभ्यागतांना आपुलकी आणि स्नेहपूर्ण भेट देण्याच्या पद्धती बद्दल निलेश आखाडे यांनी आभार व्यक्त केले.
www.konkantoday.com