मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; युवा सेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

खेड : शहरातील रस्त्यांवर झुंडीने फिरून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी खेड युवा सेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. डेंग्यू, मलेरिया या सारख्या साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांचे निर्मुलन करण्यासाठी किटक नाशक फवारणीही करण्यात यावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये खेड शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्रांचा वावर कमालीचा वाढला आहे. झुडीने फिरणारे कुत्रे पादचाऱ्यांच्या अंगावर जात असल्याने नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. रात्री दुचाकीवरून उशीरा कामावरून येणाऱ्या कामगारांना तर मोकाट कुत्र्यांपासून मोठा धोका आहे. रस्त्यावर कळपाने फिरणारी ही कुत्री थेट दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जात असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शहरातील नागरिक कमालीची हैराण झाले आहेत. काही परिसरामध्ये तर कुत्र्यांच्या भितीमुळे नागरिक बाहेर पडेनासे झाले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भिती घालविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी दहशत माजवली असतानाच शहरात काही दिवसांपासून डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे. डेंग्यु, मलेरिया या सारखे साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांमुळे रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्या कोरोनाच्या महामारीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात पुन्हा जर साथीच्या रोगांची भर पडली तर नागरिकांच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत.
शहरात साथीच्या रोगांचा प्रसार रोखायचा असेल तर साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांचे निर्मुलन करण्यासाठी किटक नाशकांची फवारणी करावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. खेडचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना हे निवेदना देताना युवा सेनेचे पदाधिकारी दर्शन महाजन, रेशम पाटणे यांच्यासह अन्य युवा सैनिक उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button