तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हि सूचना महत्वाची आहे
रत्नागिरी दि.( )-कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा झालेय. पण या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना रेल्वेच्या निर्धारित वेळे आधी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाश्याची ट्रेन मध्ये प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करणार आहे.
कोकण रेल्वेच्या मार्गावर 26 सप्टेंबर पासून तुतारी तर 2 ऑक्टोबर पासून राजधानी या दोन गाड्या धावणार आहेत.या ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याची ट्रेन मध्ये चढण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रवाश्याच तापमान तपासून मगच ट्रेन मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.शासनाच्या निर्धारित तापमानापेक्षा अधिक तापमान आढळल्यास त्या व्यक्तीला ट्रेन ने प्रवास करता येणार नाही.प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता प्रवाश्यांची किमान एक तास आधी रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे असे आवाहन कोकण रेल्वे ने केले आहे.त्याच बरोबर स्थानाक परिसरात वावरताना प्रवाश्यांची परस्परात सुरक्षित अंतर ठेवून वावरायचे आहे .आयत्या वेळी येणाऱ्या प्रवाश्यांसाठी हि सूचना महत्वाची आहे तपासणी पूर्ण झाल्यावरच त्यांना ट्रेन मध्ये प्रवेश मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून ही सगळी पाऊले कोकण रेल्वे कडून उचलली जात आहेत.यामुळे तुम्ही जर कोकण रेल्वे ने प्रवास करत असाल तर तुम्हाला तुमच्या निर्धारित वेळेच्या आधी किमान एक तास रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे.
www.konkantoday.com