आगामी काळात मृत्यूदर कमी झालेला दिसेल -उद्धव ठाकरे
माझे कुटुंब, माझी जबाबदारीसारख्या मोहिमेच्या माध्यमातून कोरोनाची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून आगामी काळात मृत्यूदर आणि पॉझिटीव्हीटी दर कमी झालेला दिसेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात सर्वत्र टेलिआयसीयु व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रूग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
konkantoday.com